आज सकाळपासूनच अंतरवालीत दादा सर्वांना मार्गदर्शन करत असताना अत्यंत पोटतिडकीने सांगत होते की, स्व.महादेव मुंडे यांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचाय. ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचे दुःख आपल्याला वाटून घ्यायचेय. काहीही झाले तरी आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला ज्ञानेश्वरी ताई यांना न्याय मिळवून द्यायचाय. #भाऊ म्हणून आपल्याला कर्तव्य पार पडायचेय. १ तारखेला बीडमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहून बीड जिल्ह्यातील सर्व जाती-धर्मातील लोकांनी स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या बाजूने उभा राहून आपल्याला न्यायाच्या बाजूने उभे राहायचे आहे.
असे मार्गदर्शन दादा करत होते. दिवसभर मुंबई आंदोलन आणि स्व.महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देणे एवढे दोनच विचार त्यांच्या मनात होते. दुपारनंतर अचानक त्यांना घाम यायला लागला. अचानक अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटायला लागल्यानंतर अचानक ते उठून चालायला लागले. सोबत सहकारी होते. अंतरवालीतून शहागड येथील सकुंडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी अतिशय काळजी घेत तपासण्या केल्या. औषधोपचार केले. त्यानंतर एक-दीड तासाने दादांना बरे वाटू लागले. आता दादांची प्रकृती स्थिर आहे.
एक तारखेला दादांचा वाढदिवस आहे. लोकप्रियतेच्या एवढ्या उत्तुंग शिखरावर असताना वाढदिवस असताना त्यांनी स्पष्ट सांगितले, स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबियाना न्याय मिळवून द्यायचाय. त्यामुळे १ तारखेला माझा वाढदिवस साजरा न करता ज्ञानेश्वरीताई आणि त्यांच्या मुलाबाळांच्या पाठीशी उभा राहायचा निर्णय घेतला. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना माझा वाढदिवस साजरा करू नका. आपल्याला आपल्या बहिणीला न्याय मिळवून द्यायचाय… खरच जरांगे पाटील होणे सोपे नाही..!
0 टिप्पण्या