लाडक्या बहिणींचा लाडका दादा.. आज बहिणींना पोरक करून गेला..
आज सकाळी महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे.
दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

हे छोटेखानी विमान लँडिंगदरम्यान विमान कोसळलं. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. बारामतीमधील या भीषण विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA ने दिली आहे. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी धूराचे मोठे लोट आले. तर विमानाला मोठी आग लागली. त्यात हे विमान जळून खाक झाले. या भीषण अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला.बारामती विमानतळाजवळील शेतात त्यांचे विमान कोसळले. विमानाला भीषण आग लागली. आज अजितदादांच्या चार सभा होत्या. त्यासाठी ते येत होते. दरम्यान हे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले. त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. यंत्रणा ही धावल्या. पण अपघात अत्यंत भीषण होता. मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते. या विमान अपघाताने पवार कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. तर राज्यालाही मोठा धक्का बसला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली. याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. एक दिलखुलास, रोखठोक नेता या विमान अपघाताने हिरवला आहे. त्यांची प्रशासनावर मोठी पकड होती. या आठवणी आता कार्यकर्त्यांच्या मनात कायम घर करतील.

0 टिप्पण्या