दाक्षिणात्य चित्रपटांना मराठमोळ्या अभिनेत्रींची भुरळ ....
भाग्यश्री बोरसे असे या अभिनेत्रीचे नाव आहे. भाग्यश्री बोरसे मूळची छत्रपती संभाजी नगरची. तीचे शिक्षण पुण्यातच झाले असून बिजनेस मॅनेजमेंट शिक्षणासाठी ती परदेशात गेली होती. त्यानंतर भाग्यश्रीने मॉडेलिंगची सुरुवात केली. चंदू चॅम्पियन या चित्रपटात ती एका छोट्याशा भूमिकेत झळकली होती. पण यानंतर भाग्यश्रीने दक्षिणेकडे मोर्चा वळवला. मिस्टर बच्चन या चित्रपटात तिला अभिनयाची संधी मिळाली. आज ३१ जुलै रोजी विजय देवरकोंडाची प्रमुख भूमिका असलेला 'किंगडम' हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात भाग्यश्री बोरसे नायिकेची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामुळे भाग्यश्रीला मोठी लोकप्रियता मिळू लागली आहे. खरं तर ही मराठी मुलगी आहे यावरच अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कांथा हा भाग्यश्रीचा आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तूर्तास आज प्रदर्शित होत असलेल्या किंगडम हा चित्रपट भाग्यश्रीच्या आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळवून देईल याची खात्री वाटते!.
0 टिप्पण्या