मोडी ते मराठी ट्रान्सलेटर आला;
कुणबी नोंदींची संख्या वाढणार..
प्रत्येक मराठा कुटुंबाचे ऐतिहासिक दस्तावेज, सरकारी कागदपत्र हे मोडी लिपीत आहेत. काळानुसार मोडी भाषेचा वापर कमी झाला आणि घरातील, सरकारी दप्तरातील जुने दस्तऐवज त्याचा अर्थ न समजल्यामुळे अर्थहीन झाले आहेत. असे चार कोटी सार्वजनिक व तेवढेच खाजगी कागदपत्र पडून आहेत. अनेक मोडी भाषा तज्ञ लिप्यंतर करतात परंतु त्यांची संख्या आणि उपलब्धता फारच कमी आहे.
सध्या इंटरनेटवर आपण जगातील अनेक भाषा ट्रान्सलेट करू शकतो. परंतु मोडी लिपी ट्रान्सलेटर उपलब्ध नव्हता. हे काम IIT रुडकीने AIच्या माध्यमातून शक्य करून दाखवले आहे.
MoScNet हे AI मॉडेल काय आहे?
IIT रुडकीने एक संशोधन सादर केले आहे. "हिस्टोरिक स्क्रिप्टस् टू मॉडर्न व्हिजन" या प्रकल्पा अंतर्गत मोडी ते देवनागरी लिप्यंतराचा समावेश होता. यासाठी त्यांनी MoScNet फ्रेमवर्क व MoScNet हे AI मॉडेल ट्रेन केले आहेत.
हा AI मॉडेल ट्रेन करण्यासाठी अभियंत्यांनी "मोडीट्रान्स डेटासेट"ला दोन हजारांहून अधिक मोडी भाषेतील कागदपत्रांचे इनपुट्स व मोडी तज्ञांनी प्रमाणित केलेले मराठी(देवनागरी) भाषांतर यांचा समावेश आहे.
कुणबी नोंदणीची संख्या वाढणार
सध्या न्या.शिंदे समितीच्या माध्यमातून सरकारी दफ्तरातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. समितीकडून ५८ लाख कुणबी नोंदी शोधल्या गेल्या आहेत. इतर शासकीय विभाग व घराघरात असलेल्या मोडी भाषेतील जून्या कागदपत्रांचे वाचन झाले तर कुणबी नोंदींची संख्या वाढणार आहे. मोडी ते मराठी लिप्यांतराचा हा AI मॉडल कसा वापरावा याबद्दल सविस्तर माहिती लवकरच मराठामार्ग वर दिली जाईल.
महत्वाचं म्हणजे हे AI मॉडेल आणि डेटासेट दोन्ही Open Source आहेत म्हणजे.. आपण ते मोफत वापरू शकतो. या टीमचे खूप खूप आभार! त्यांनी तयार केलेला एआय मॉडेल इतिहास संशोधन व कुणबी नोंदी ओळखण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.
.png)
.png)
1 टिप्पण्या
best
उत्तर द्याहटवा