अनेक कारणांनी ठरली ऐतिहासिक भेट
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परळी मध्ये येऊण न्यायासाठी टाहो फोडणाऱी पिडीत भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांची भेट घेतली.. पिडित भगिनीच्या माहेरातील सदस्यांचा परळीतील दोन्ही आजी माजी लोकप्रतिनिधींच्या थेट घरामध्ये सतत वावर आसताना देखील, दोघांकडुण हि हेळसांड करण्यात आलीचे दिसून आले, व ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांचा कोणताही संबंध नसताना केवळ मिडीयाच्या माध्यमातुन जरांगे पाटलांना एक आवाज दिला आणि दोन दिवसात मनोज दादा जरांगे पाटील थेट ज्ञानेश्वरी ताईच्या घरी आले व भावाप्रमाणे मायेचा आधार देत न्याय मिळवुण देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आसल्याचे जाहीर सांगीतले
आता ऐतिहासिक भेटी मुळे मराठा वंजारी वाद निर्माण करणाऱ्यांना जबरदस्त चपराक बसली असून मनोज दादा जरांगे पाटील हे वंजारी द्वेषी नसुन फक्त गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात आणि सर्व वंचित पिडीत गोर गरीबांचे अश्रु पुसायचे संस्कार त्यांच्यावर आसल्याचे दिसून आले, जरांगे पाटील सर्वसमावेशक संघर्ष योद्धा आहेत हे सर्व जनतेला दिसून आलं.. तसेच इतरांचा उगाच विनाकारण पाटलांचा विरोध कधीच करु नये, कारण ज्यांचे समर्थन आयुष्यभर केले त्यांनी साधी कोणतीही मदत केळी ना या विरोधात आवाज उठवला, ना साथ दिली.. पण ज्यांचा तिरस्कार केला तेच जरांगे पाटील सगळ बाजूला करून अश्या वाईट वेळेत मदतीसाठी पुढे आले आहेत..
सदरची हि ऐतिहासिक भेट खुप काही शिकवुण जात आहे, विचार करायला लावते, पण जरांगे पाटील पीडित महादेव मुंडे कुटुंबाला न्याय नक्कीच मिळवून देतील हा विश्वास आपोआप निर्माण हितोय..


0 टिप्पण्या