मनोज जरांगे पाटील सध्या पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत, या ठिकाणी मुंबई मोर्चासाठी आढावा बैठक आयोजित केली गेली होती तसेच या दरम्यान राज्यातील धनगर बांधवांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मुंबई मोर्चा मध्ये आम्ही सुद्धा या मोर्चामध्ये शामिल होणार असे पत्रकार परिषद घेऊन सर्व महाराष्टाला सांगितले
परंतु पत्रकार परिषद संपल्या नंतर अनेक पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरवात केली राज्यातील अनेक घडामोडींवर प्रश्न विचारात असताना एका प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले कि या वेळेस आरक्षण घेतल्याशिवाय मी काही माघारी येणार नाही तसेच मी काही छक्के पंजे करणारा माणूस नाहीये , माझ्या समाजाच्या गरीब जनतेला मी न्याय दिल्यशिवाय मुंबई वरून काही परत फिरणार नाही, परंतु हे सगळं बोलत असतानाच समाजातील जनतेला हळहळ करणार वाक्य जरांगे पाटील बोलले .
माझं उपोषण करून करून शरीर कमजोर झाल आहे माझा या दरम्यान काही भरवसा नाही मी जगल कि मरल!!!
हे वाक्य सोसिअल मीडिया वरती जाताच चाहत्यांनी अशे अशुभ बोलू नये अश्या अश्ययाचे मॅसेज सोसिअल मीडिया वरती केले आहेत.


0 टिप्पण्या