हल्लीं ना ही नविन पिढी Zomato, Swiggy, Instagram ह्याच्या एवढे प्रेमात आहेत की त्यांना दुकानात हे सामान जरा स्वस्त मिळतं ह्यावर विश्वास नाही. आता साधी गोष्ट सांगते...काल ना मला जराशी ओली भेळ, थोडसं रगडा पॅटीस आणि थोडासा दहीवडा खावासा वाटला...क्या करे मजबुरी हैं...कधी तरी दुसऱ्याच्या हातच बर वाटतं. तर मी सहजच माझ्या लेकाचा फोन आल्यावर त्याला बोलले आज सकाळी जेवणं थोडसच केलं संध्याकाळी मी आणि बाबा हे एवढं खाणार आहे. माझ्या लेकाने फोनवर पहिलं विचारलं ' तू चालायला जातेस ना? योगा आणि exercise करतेस ना वेळेत?' ( खरंतर ह्याचा आणि चटर पटर खाण्याचा थोडासा संबंध आहे पणं तरीही मी मोठ्याने ' हो ' सांगितलं) मग त्याने मला सांगितलं आई तू Zomato, Swiggy download कर, Zomato वर मागवल तरं तुला घराच्या घरी हे खाता येईल.'.

ही पिढी स्मार्ट आहे बघुया आपण आपला स्मार्टनेस दाखवूया... Zomato app download केलं...पुण्यात नटराज भेळ फेमस आहे, त्याच्याकडे ही प्रत्येक डिश ४०/- रुपये आहे...दहीवडे ५०/- रूपये ...एवढं मला पणं महिती.... त्याच्याकडे भेळ टाकली ९९/- रुपये आली, दहीवडे १२०/-, रगडा पॅटीस ९९/-... बोला आता...मला जरा का हे एवढ्यासाठी प्रत्येक डिश वर ६०/- रुपये जास्त मोजावे लागतं असतील तरं....मी काय करावं ?....बर डिस्काउंट बघितलं तर ही डिश ८९/- रुपयाला पडत होती म्हणजे दहा रुपये कमी... आम्ही सरळ तिकडे गेलो...पाच मिनिटांवर होते ते....घरापासून, छान गरम गरम हादडून आलो.
५३०/- रूपया ऐवजी ३२०/- मध्ये पोटभर खाऊन वरती सुकी पुरी पणं घेतली...ती पणं खाल्ली... लेकाने मला फोन केला त्यावर त्याला सुनावलं...' अरे तूच म्हणतोस की exercise करत जा...हेच चालणं माझे जाऊन येऊन साडेसहाशे पावलांच झालं...अजून काय हवे आहे...'
एवढी स्मार्ट पिढी पणं घरातून सगळं ऑर्डर करायचं..जे काही आलय त्यात किडक नासक बघायचं नाही...तर. आपल्याला दोन कपडे चढवून उतरावं लागलं नाही ह्याचं समाधान....पैसा काय comfort zone साठी कमावतो आहे...तोच घालवायचा... आनंदी आनंद गडे.
0 टिप्पण्या